नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५०३वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:46 PM2020-05-06T20:46:10+5:302020-05-06T20:49:13+5:30

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.६) जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०३वर पोहचला. ...

In Nashik, the number of corona victims reached 503 | नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५०३वर

नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५०३वर

Next
ठळक मुद्दे लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यकजिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरूशहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या ११

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.६) जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०३वर पोहचला. मालेगावमध्ये सर्वाधिक ४१३ कोरोनाबाधित रुग्ण अद्याप आढळून आले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत मालेगावात ३२ रूग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. नाशिक शहरात मानेकशानगर भागातसुध्दा एक कोरोनाबाधित रूग्ण बुधवारी आढळून आला. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता २२वर जाऊन पोहचला आहे.

एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली. अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला गेल्याचे दिवसभराच्या चित्रावरून दिसून आले.
सोमवारी एका महिला डॉक्टराला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर एका गरोदर महिलेचाही मृत्यू पश्चात कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. या महिलेचे माहेर द्वारकेजवळील बजरंगवाडी परिसरातील असून सासर सिन्नर गावातील आहे. या महिलेचा दीर मुंबईच्या रेडझोनमधून तीला भेटण्यासाठी आला होता, यामुळे कदाचित तिला संसंर्ग झाला असावा, असा अंदाज मनपा आरोग्य विभागाने वर्तविला आहे. आता शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या ११ झाली असुन शहरातील बहुतांशी भाग आता प्रतिबंधीत क्षेत्र झाला आहे.
शहरात गेल्या 26 एिप्रल रोजी जिल्हा रु ग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टराला करोना झाल्याचे समोर आले होते. यामुळे हे डॉक्टर राहत असलेला म्हसरुळ शिवारातील वृंदावननगर हा परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषीत करण्यात आला होता. त्यानंतर 2 मे रोजी जिल्हा रु ग्णालयातील जेष्ठ डॉक्टर व महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेला फार्मासिस्ट अशा दोन आरोग्य सेवकांना करोना झाल्याचे समोर आले होते. आता सोमवारी (दि.4) रोजी शहरातील एका खाजगी रु ग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला करोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. ही महिला द्वारका भागात असलेल्या जनरल वैद्यनगर भागातील वृंदावन कॉलनीत राहत असल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केला आहे. या परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात आले असुन याठिकाणी आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन अगोदरच घोषीत असलेल्या बजरंगवाडी येथील एका गरोदर महिलेचा 2 मे रोजी मृत्यु झाला.

Web Title: In Nashik, the number of corona victims reached 503

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.