नाशिक महापालिकेची पाणी पट्टी आटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:12 IST2021-05-29T17:10:37+5:302021-05-29T17:12:32+5:30

नाशिक- महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्याने कारवाईबाबत देखील महापालिकेचे हात बांधलेले आहेत. 

Nashik Municipal Corporation's water supply is cut off! | नाशिक महापालिकेची पाणी पट्टी आटली!

नाशिक महापालिकेची पाणी पट्टी आटली!

ठळक मुद्दे उद्दीष्ट ६५ कोटी, वसुली ३ कोटी ७० लाखआत्तापर्यंत अवघी १४ टक्के वसुली

नाशिकमहापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्याने कारवाईबाबत देखील महापालिकेचे हात बांधलेले आहेत. 

नाशिक महापालिकेची घरपट्टीतील वाढ शंभर कोटी रूपये ओलांडून गेली असली तरी पाणी पट्टी मात्र जैसे थे आहे. गेल्या वर्षभरापासून घरपट्टीत अडचणी येत असल्या तरी महापालिका अभय योजना तसेच अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून वसुली वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरल्यास पाच टक्के सुट देण्याची योजना मे अखेर पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, पाणी पट्टीची स्थिती बिकट आहे. त्याचा परीणाम गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही जाणवत आहे. नाशिक शहरात १ लाख ९९ हजार ६८६ नळ जोडण्या आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १५३ कोटी ५३ लाख रूपयांच्या घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात जेमतेम ३२ टक्के पट्टीच वसुल झाली होती. 

महापालिकेला यंदाच्या वर्षी सारे काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच मात्र पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट उदभवले. त्यामुळे १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २०२२ या कालवधीत ६५ कोटी रूपयांचे उद्दीष्ट दिले असताना प्रत्यक्षात आत्तापर्यंत केवळ ३ कोटी ७० लाख रूपये वसुल झाले आहेत. यात सातपूर विभागात २४ लाख ५४ हजार, पंचवटीत ९३ लाख १५ हजार, सिडको विभागात ७५ लाख ७६ हजार, नाशिकरोड विभागात एक कोटी, नाशिक पश्चीम २० लाख ७४ तर नाशिक पूर्व विभागात २० लाख १४ या प्रमाणे रकमेचा समावेश आहे. 

Web Title: Nashik Municipal Corporation's water supply is cut off!