शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

नाशिक महापालिकेतील मनसेच्या नगरसेविका सुरेखाताई भोसले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:23 AM

दुपारी अंत्यसंस्कार : चार वेळा भूषविले होते नगरसेवकपद

ठळक मुद्देमनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या त्या काकू होतघरात राजकीय वारसा लाभलेल्या सुरेखातार्इंनी १९९७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले

नाशिक - नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक १३ मधील महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सौ. सुरेखा रमेश भोसले यांचे कर्करोगाने निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या त्या काकू होत. त्यांच्या निधनामुळे रविवार कारंजा तसेच भद्रकाली परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.सुरेखाताई भोसले यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सुरेखाताई यांना फेबु्रवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतच त्रास सुरू झाला होता. तेव्हापासून त्या आजारीच होत्या. कर्करोगाशी सामना करत असतानाच मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. एक विनम्र, शालिन व्यक्तिमत्व आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची शहरात ओळख होती. रुंग्टा हायस्कूल आणि बी.वाय.के. महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सुरेखातार्इंचे आजोबा लक्ष्मणराव ठाकरे हे जुन्या पिढीतील सिनेनट होते तर त्यांचे वडिल रामदास ठाकरे हे एसटीचे पहिले कंट्रोलर होते. त्यांच्या आजी गोदूताई ठाकरे या नगरपालिका काळात उद्यान विभागाच्या सभापती होत्या तर त्यांचे दीर केशवराव भोसले हे नगरपालिका काळात नगरसेवक होते. घरात राजकीय वारसा लाभलेल्या सुरेखातार्इंनी १९९७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर, झालेल्या चार निवडणुकांमध्ये त्यांना फक्त एकदा पराभव पत्करावा लागला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी चौथ्यांदा विजय संपादन करत महापालिकेत प्रवेश केला होता. मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात त्यांनी सभागृहनेतापद भूषविले होते. याशिवाय, आपल्या नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत त्यांनी प्रभाग समिती सभापतीपद, स्थायी समिती, महिला बाल कल्याण समितीवरही सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका