नाशिक महापालिकेचा अभियंता बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 16:30 IST2018-05-26T16:30:47+5:302018-05-26T16:30:47+5:30

नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाययक अभियंता रवी पाटील हे शनिवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.

Nashik Municipal Corporation's Engineer missing | नाशिक महापालिकेचा अभियंता बेपत्ता

नाशिक महापालिकेचा अभियंता बेपत्ता

नाशिक-  नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाययक अभियंता रवी पाटील हे शनिवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. शहरातील डिसुझा कॉलनीत त्यांचे घर असून सकाळी नाशिक मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जातो, असे सांगून पहाटे घराबाहेर पडले. मात्र कार्यक्रमाला न जाता बेपत्ता झाले. त्यांची कार घराजवळच होती. या कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण जात आहोत, कोणाचे वाईट केलेले नाही तसेच आपला शोध घेऊ नये अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.

त्यांचा मोबाइलदेखील मोटारीतच आढळला आहे. या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून महापालिकेचे सर्व अभियंते पोलीस ठाण्यात जमा झाले आहेत. महापालिकेतील कामाच्या ताण तणावाची या निमित्ताने चर्चा होत आहे.

Web Title: Nashik Municipal Corporation's Engineer missing