नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:32 AM2018-08-29T01:32:44+5:302018-08-29T01:33:36+5:30

शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत.

 Nashik Municipal Corporation's 30 easy toilets stolen | नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस

नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस

googlenewsNext

नाशिक : शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत.  तथापि, महापालिकेच्या आरोग्य विभागाने या शौचालयांचा शोध घेतानाच सुलभ कंपनीला दंडासहीत भरपाईची नोटीस आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बजावली आहे.  राज्यात कोणत्याही महापालिकेत वेगवेगळे घोटाळे उघडीस येतात मात्र नाशिक महापािलकेत कचरा, मलजलनिस्सारण यासारख्या ठेक्यांमध्येही गैरव्यवहार झाल्याची उदाहरणे आहेत आता तर शौचालय घोटाळा झाला असून, या घोटाळ्यामुळे अशा ठेकेदारांना पोसरणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील सार्वजनिक शौचालयांचा विषय गाजत होता. शहरात सार्वजनिक शौचालये आणि प्रसाधनगृह अपुरी असल्याने नाशिक शहरात नवीन शौचालये बांधण्याची मागणी होत होती. नवीन सुमारे दोनशे शौचालय बांधण्याचे काम प्रलंबित होते. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने शोध मोहीम घेतली तेव्हा शहरात अनेक शौचालये अगोदरच पीपीपी तत्त्वावर सुलभ या संस्थेशी करार करून त्यांना शौचालये चालविण्यास दिल्याचे आढळले. त्यामुळे त्याचाही शोध घेतला असता १९९२ पासून आत्तापर्यंत लहान-मोठी १५३ शौचालये या कंपनीला महापालिकेने करार करून चालविण्यास दिल्याचे आढळले. ही शौचालये कोठे आहेत याचा अनेक अधिकाºयांनाही पत्ता नाही. त्यामुळे ठेकेदारालाच ही शौचालये दाखवण्यास सांगण्यात आले. त्यावेळी संबंधित ठेकेदार १५३ पैकी १२३ शौचालयेच दाखवू शकली उर्वरित तीस शौचालये ते
दाखवू शकले नाहीत. मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही संबंधित ठेकेदार हे सुलभ शौचालये दाखवू शकले नसल्याने आता या कंपनीला महापालिकेने दंडासह रक्कम भरण्याची  नोटीस बजावली आहे. महापालिकेत सुलभ कंपनीला काम देण्यासाठी मोड्यूल तयार करून देणाºया
एका ज्येष्ठ नगरसेवकाचा यात सहभाग असल्याची चर्चा आहे.  कंपनीचे कंत्राट अडचणीत आल्याचे दिसल्यानंतर संबंधितांनी आता मोठ्या प्रमाणात सारवासारवीचे चित्र सुरू केल्याचे वृत्त आहे.  तथापि, महपालिकेत अनेक चमत्कार घडत असतात, आता तर चक्क  तीस शौचालये गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
शौचालयांना ’जीओ टॅग’
महापालिकेची चक्क शौचालये चोरीस गेल्याचा प्रकार आढळल्याने नवीन दीडशे शौचालये बांधताना जीओ टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे किमान शौचालये दिसू लागली आहे.

Web Title:  Nashik Municipal Corporation's 30 easy toilets stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.