नागरी प्रशासनात नाशिक मनपा राज्यात प्रथम; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

By श्याम बागुल | Published: April 21, 2023 03:43 PM2023-04-21T15:43:12+5:302023-04-21T15:43:26+5:30

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील अ, ब व क महापालिकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक महापालिका नागरी प्रशासनात राज्यात अव्वल ठरली.

Nashik Municipal Corporation first in the state in civil administration; Commissioner from Chief Minister, Deputy Chief Minister. Honor of Pulkundwar | नागरी प्रशासनात नाशिक मनपा राज्यात प्रथम; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

नागरी प्रशासनात नाशिक मनपा राज्यात प्रथम; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

googlenewsNext

नाशिक : गेल्या आर्थिक वर्षात नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

विक्रमी करवसुली, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) मध्ये केलेली कामगिरी आणि प्रशासकीय खर्चात कपात केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. नगरविकास दिनानिमित्त राज्यातील अ, ब व क महापालिकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक महापालिका नागरी प्रशासनात राज्यात अव्वल ठरली.

Web Title: Nashik Municipal Corporation first in the state in civil administration; Commissioner from Chief Minister, Deputy Chief Minister. Honor of Pulkundwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक