Nashik Municipal Corporation Election 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू असून दोन दिवसापूर्वी ठाकरे बंधूंची सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
"आज मी नाशिकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा प्रभु श्रीरामाला नमन करतो. श्रीरामांच्या चरणी मी नतमस्तक होतोय. पण, काल दोन भाऊ नाशिकमध्ये येऊन गेले. पण, त्यांना रामाची आठवण झाली नाही. आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर साधला. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकानिवडणुकीसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना पत्युत्तर दिले.
आम्ही तक्रार करणारे नाही
"या ठिकाणी काहीजण देवाची खिल्ली उडवायला लागले. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, नाशिकमध्ये जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आहे. येथे माझी खिल्ली उडवली, म्हणाले नाशिक दत्तक घेतले होते त्याच काय झालं. खऱ्या अर्थाने मी नाशिक दत्तक घेतोय असे सांगितले होते. मी त्यानंतर तक्रार केली नाही. मी नाशिक दत्तक घेतले हे २०१७ साली सांगितले पण २०१९ साली मी विरोधी पक्षनेता झालो. पण मी तक्रार केली नाही. मला दोनच वर्षे मिळाले. आम्ही तक्रार करणारे नाही, असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेते पदाच्या काळात देखील आम्ही काम केले. ज्यावेळी कोविडचा काळ होता त्यावेळी उबाठा, मनसे, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्यावेळी हा देवाभाऊ नाशिकमध्ये आला होता.प्रत्येक कोविड केअर सेंटर आणि आयसीयूपर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण, मला तुम्हाला विचारचं आहे. तुम्ही कितीवेळा नाशिकला आले. मी वर्षातून चारवेळा येतो. निवडणूक आली की नाशिकला यायचे आणि निवडणुका झाल्या की नाशिकला विसरायचे. हे निवडणूक पर्यटक आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Web Summary : Devendra Fadnavis criticized Uddhav and Raj Thackeray, stating they've forgotten Lord Ram. He questioned their commitment to Nashik's development, highlighting his own efforts during the Covid crisis and accusing them of being mere 'election tourists'.
Web Summary : देवेंद्र फड़नवीस ने उद्धव और राज ठाकरे की आलोचना करते हुए कहा कि वे भगवान राम को भूल गए हैं। उन्होंने नासिक के विकास के प्रति उनकी प्रतिबद्धता पर सवाल उठाया और कोविड संकट के दौरान किए गए अपने प्रयासों को उजागर किया।