शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:10 IST

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा; दोघे जवळपास २२ वर्षांनंतर नाशिकमध्ये एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : आम्ही आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, तर राज्यातील भावी पिढीच्या सुरक्षित भवितव्यासाठी एकत्र आल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या पहिल्या संयुक्त सभेत केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील दोघांची पहिली संयुक्त सभा येथील अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी सायंकाळी झाली. दोघे जवळपास २२ वर्षांनंतर नाशिकमध्ये एकत्र आले होते.

राज्यातील जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडून भाजप आणि शिंदेसेना केवळ फोडाफोडी आणि भ्रष्टाचारात मश्गुल असून, दलालांच्या माध्यमातून मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा उद्योग सत्ताधारी करत असल्याची टीका उद्धव व राज ठाकरे यांनी येथील संयुक्त प्रचारसभेत केली.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना आमची पोरे पळवावी लागत आहेत. फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती, मात्र वास्तवात आता त्यांना आमच्या पक्षातील नेते-कार्यकर्ते दत्तक घ्यावे लागत आहेत.  सध्या भाजपमध्ये बाहेरच्यांची एवढी गर्दी झाली आहे की, निष्ठावंतांना कुठेच जागा नाही. 

एका घरातील ३ उमेदवारांना १५ कोटी रुपयांची ऑफर

महाराष्ट्रात ६०-७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची छाटणी करण्यापूर्वीच भाजपने आपल्या निष्ठावंतांची छाटणी केल्याची टीकाही राज यांनी यावेळी केली. 

निवडणुका पुढे का गेल्या, उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे का गेल्या, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवे असे सांगत १९५२ साली जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यायला लागतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपची खिल्ली उडवली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brothers unite for future generations, not personal survival.

Web Summary : Uddhav and Raj Thackeray united for future generations, criticizing BJP and Shinde Sena for corruption and land scams. They accused the ruling parties of poaching leaders and offering huge sums for electoral gains, questioning the delay in local body elections.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे