Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:47 IST2025-12-12T11:43:32+5:302025-12-12T11:47:26+5:30
Leopard in Nashik Today Video: रात्रपाळीला कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार यांना बिबट दिसून आल्याची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवली.

Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
नाशिक : सीबीएसपासून जवळ असलेल्या व अत्यंत वर्दळीच्या गडकरी चौकात पोलिस महानिरीक्षक (आयजी) दत्तात्रय कराळे यांच्या सरकारी कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता बिबट्या दिसून आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या जवळच असलेल्या नंदिनी नदी पात्रातून गडकरी चौकात आला असल्याचा अंदाज आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला, मात्र परिसरात व आजूबाजूला शोध घेतला असता बिबट्या मिळून आला नाही. रात्रपाळीला कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार यांना बिबट दिसून आल्याची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवली. वन विभागाच्या रेस्क्यु टीमसह वन्यप्राणी बचाव पथक, शहर पोलिसांचे श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीमुळे मिळाला बिबट्या आल्याचा पुरावा
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वानपथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आयजी ऑफिस व शासकीय निवासस्थान परिसर पूर्ण पिंजून काढला.
नाशिकमध्ये सीबीएसपासून जवळ असलेल्या व अत्यंत वर्दळीच्या गडकरी चौकात पोलिस महानिरीक्षक (आयजी) दत्तात्रय कराळे यांच्या सरकारी कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता बिबट्या दिसून आला.#Maharashtra#nashik#leopard#viralvideopic.twitter.com/ZTh79TwEuu
— Lokmat (@lokmat) December 12, 2025
नाशिक शहर पोलिस उपायुक्त कार्यालय, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत इतक्या आढळून आला नाही त्यामुळे तो कुठे गेला असावा याचा शोध वन विभागातर्फे सुरू आहे.