नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:54 IST2025-05-01T14:50:33+5:302025-05-01T14:54:08+5:30
Nashik News: नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यातून एक आरोपी पोलिसांसमोरून पळून गेला होता. त्याला अटक करण्यात अखेर यश आले आहे. ज्याने आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली होती, त्यालाही पोलिसांनी पकडले.

नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
Nashik Crime news: भद्रकाली पोलीस ठाणे परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. एक १९ वर्षाचा आरोपी पोलिसाच्या हाताला झटका देतो आणि फरार होतो. एखाद्या चित्रपटातील सीन सारखाच हा व्हिडीओ आहे. हा आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. पण, अखेर अडकलाच. जिथून पळून गेला होता, त्याच पोलीस ठाण्यात त्याला परत यावं लागलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी अटक केलेला संशयित क्रिश किरण शिंदे (१९, रा.५४ क्वार्टर, नानावली) हा मंगळवारी (२९ एप्रिल) पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळत एका दुचाकीचालक साथीदाराच्या मदतीने फरार झाला होता.
वाचा >>"तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
पोलीस ठाण्याच्या बाहेर पळून जाणाऱ्या आरोपीची स्कुटीसह एक जण वाट बघत होता. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्याला शोधपथकाने इगतपुरी भागातील जंगलातून २४ तासांत बेड्या ठोकल्या.
पोलीस कोठडीतून बाहेर आणल्यानंतर पळाला होता आरोपी
तपोवन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे (४०, रा. अनुसयानगर) यांच्यावर कोयत्याने
तिघांनी हल्ला केला होता. गुन्ह्यात जुने नाशिकमधील संशयित क्रिश शिंदे याच्यासह अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले होते. तपासाकरिता पोलिसांनी सुरक्षा कोठडीतून बाहेर आणल्यानंतर शिंदे पळाला होता. बाहेर दुचाकी घेऊन उभा असलेला त्याचा मित्र किरण युवराज परदेशी (रा. कथडा) यालाही पोलिसांनी अटक केली.
In a shocking breach of security, Krish Shinde, an accused in a fatal attack case, escaped from Bhadrakali Police Station in Nashik by simply pushing a cop and fleeing on a two-wheeler — all caught on CCTV. pic.twitter.com/lQeHkKiq27
— theperfectvoice.in (@perfectvoice_in) April 30, 2025
दुचाकीने परदेशी याने शिंदे यास निलगिरी बागेत मंगळवारी रात्री नेऊन सोडले होते. तेथून त्याने इगतपुरी गाठले. पोलिसांनी इगतपुरी भागातील जंगलाच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे.