Nashik: कनाशी शासकीय आश्रम शाळेच्या मुलींचा पायी मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:01 IST2023-02-28T14:00:32+5:302023-02-28T14:01:33+5:30
Nashik: कनाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील सुमारे २०० मुलींनी ' हमारी मांगे पुरी करो' ' जाती -भेद नष्ट करा' , 'आमचा सबंध पि.ओ. साहेबांशी' अशा घोषणा देत थेट कनाशी आश्रमशाळे पासून अभोणा मार्गे कळवण प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढला.

Nashik: कनाशी शासकीय आश्रम शाळेच्या मुलींचा पायी मोर्चा
- सुभाष शहा
नाशिक - कळवण तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील सुमारे २०० मुलींनी ' हमारी मांगे पुरी करो' ' जाती -भेद नष्ट करा' , 'आमचा सबंध पि.ओ. साहेबांशी' अशा घोषणा देत थेट कनाशी आश्रमशाळे पासून अभोणा मार्गे कळवण प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढला.
अभोणा शहरात सदर मोर्चातील मुलींशी मोर्चा सबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला कोणालाच काही सांगायचे नाही.आमचा सबंध थेट पि.ओ. साहेबांशीच अशा घोषणा देत कळवण प्रकल्प कार्यालयाकडे पायी मोर्चाने प्रस्थान केले. सकाळी८.३० वाजता कनाशीहून पायी मोर्चा निघाला. ९.३० वाजता अभोणा चौफुलीवर मोर्चा आला. अचानक निघालेल्या मुलींच्या या मोर्चाने कनाशी आश्रम शाळा प्रशासनासह पोलीस प्रशासनाची धावपळ उडाल्याचे बघावयास मिळाले.