नाशिक : प्रादेशिक अंतर्गत विमान उडान योजनेत नाशिकचा समावेश होऊन त्यात सप्टेंबर अखेर विमानाचे उड्डाणच (टेकआॅफ) न झाल्याने या योजनेतून नाशिकला वगळण्यात आले होते. मात्र विमान उड्डाण न होण्याचे कारण तांत्रिक असल्याचे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला समजावून सांगितल्याने पहिल्या यादीतून वगळलेल्या नाशिकचा समावेश आता दुसºया यादीत झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.उडान या योजने अंतर्गत या अगोदर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेत (आर.सी.एस.) महाराष्ट्रातील दहा एअरपोर्टवर हवाई जोडणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामध्ये एअर डेक्कन या विमान कंपनीला नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे हे मार्ग मिळाले होते आणि ही विमानसेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु मुंबई विमानतळ प्राधिकरणाने या संस्थेला स्लॉट न मिळाल्या कारणाने सदरची विमानसेवा ही लांबणीवर पडली. परंतु आर.सी.एस.च्या नियमाप्रमाणे ज्या विमानतळाला एका हप्त्याला १४ लँडिंग व टेक आॅफ न झाल्यास तो एअरपोर्ट आर.सी.एस. योजनेच्या बाहेर निघणार होता. त्यानुसार नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे यामुळे नाशिक एअरपोर्ट आर.सी.एस.च्या यादीतून वगळण्यात आले. परंतु खासदार हेमंत गोडसे यांनी राष्टÑीय विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांची भेट घेऊन आपण ही विमानसेवा सुरू झाली, असा अंदाज ठेवून नाशिक आर.सी.एस.च्या यादीतून वगळलं परंतु अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही आणि म्हणून जोपर्यंत अखंडित सेवा सुरू होत नाही तोपर्यंत नाशिक वगळल्या जाऊ नये. खासदार हेमंत गोडसे यांनी मांडलेल्या या सूचनेची दखल घेऊन केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने त्यांची सूचना मान्य केली आणि त्यानुसार नाशिकचा आर.सी.एस.च्या दुसºया यादीमध्ये समावेश झाला असून, त्यामध्ये जेटएअरवेज आणि एअरअलायन्स या दोन कंपन्या अहमदाबाद-नाशिक-बंगळुरू या मार्गाकरिता प्रयत्न करत होत्या त्यांनाही निश्चितच बिडिंग साठी संधी मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या विमान सेवेच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
उडान योजनेत दुसºयांदा नाशिकचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:19 IST