Nashik: नाशिकमध्ये कब्रस्तानच्या जागेत उभारलेल्या २५ अनधिकृत दुकानांवर मनपाचा हातोडा, मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 10:19 IST2023-05-04T10:18:57+5:302023-05-04T10:19:39+5:30

Nashik: नाशिक शहरातील शालिमार येथील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेत गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळापासून कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या 20 ते 25 अतिक्रमित  दुकानांवर मनपाने हातोडा चालवला.

Nashik: In Nashik, 25 unauthorized shops set up in the cemetery area were attacked by municipal hammer, heavy police force and crackdown. | Nashik: नाशिकमध्ये कब्रस्तानच्या जागेत उभारलेल्या २५ अनधिकृत दुकानांवर मनपाचा हातोडा, मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कारवाई

Nashik: नाशिकमध्ये कब्रस्तानच्या जागेत उभारलेल्या २५ अनधिकृत दुकानांवर मनपाचा हातोडा, मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कारवाई

- राजू ठाकरे

नाशिक : शहरातील शालिमार येथील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेत गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळापासून कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या 20 ते 25 अतिक्रमित  दुकानांवर मनपाने हातोडा चालवला.

पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्याला घेऊन महापालिकेने भल्या सकाळी ही धडक कारवाई केली. कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या वीस ते पंचवीस गाळ्यांच्या माध्यमातून भाड्यापोटी दरमहा लाखो रुपये उकळले जात असल्याची चर्चा वेळोवेळी होत होती.

तक्रारदार कुतबोद्दीन शेख यांनी 2019 मध्ये मनपाला दिलेल्या तक्रार अर्जानुसार त्यांनी कब्रस्तानच्या आरक्षित दोन एकर जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून जागा दफनभूमीसाठी मोकळी करून देण्याची विनंती केली होती. त्याआधारे मनपाने चौकशी करीत 24 गाळे मालकांना नोटिसाही बजावल्या होत्या. आज अखेर मोठ्या फोज फाट्यासह पोलीस बंदोबस्तात मनपा विभागाने सकाळी सात वाजता कारवाई करत ही अनाधिकृत दुकाने हटवून कब्रस्तानची दोन एकर जागा मोकळी केली.

Web Title: Nashik: In Nashik, 25 unauthorized shops set up in the cemetery area were attacked by municipal hammer, heavy police force and crackdown.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.