नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 17:02 IST2020-03-01T16:59:40+5:302020-03-01T17:02:55+5:30
फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला.

नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका
नाशिक : शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून वातावरण बदलाचा क मालीचा अनुभव नाशिककरांना येत आहे. कमाल-किमान तापमानात निम्म्याचा फरक असून नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटका अन् संध्याकाळनंतर गारव्याची तीव्रता अनुभवयास येत आहे. अचानकपणे झालेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला. यामुळे अचानकपणे शहरातून बोचरी थंडी गायब झाली. कमाल तापमानाचा पारा वाढण्यास सुरूवात झाल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेतही वाढ झाली. अखेरच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशापर्यंत जाऊन पोहचला. दोन दिवसांपुर्वीच शहराचे तापमान ३३.९अंशापर्यंत पोहचले होते. शनिवारी (दि.२९) शहरात ३३.५ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले तर किमान तापमानाचा पारा १५.६ अंशावर स्थिरावला. कमाल-किमान तापमानाचा आकडा निम्म्याने कमी असला तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मात्र घसरले आहे. मागील काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. आर्द्रतेची टक्केवारी सातत्याने कमी-अधिक होत असल्यामुळे त्याचा परिणाम मानवी त्वचेवर होऊ लागला आहे. शनिवारी आर्द्रता हवामान निरिक्षण केंद्रकडून संध्याकाळी २७ टक्के मोजली गेली. शुक्रवारी मात्र आर्द्रता ४१ टक्क्यांवर तर गुरूवारी थेट आर्द्रतेचे प्रमाण १८ टक्के इतकेच होते. वातावरण बदलामुळे आर्द्रतेच्या प्रमाणात कमी-अधिक होणारी वाढ यामुळे नागरिकांची त्वचा कोरडी होत आहे.