शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 08:09 IST

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती.

नाशिक : गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच शहरातील मतदारांनी कौल दिला; मात्र यंदा परिस्थिती वेगळी झाल्याने जनतेचा कौल कोणाला मिळणार याचा फैसला गुरु वारी होणार आहे. २०१४च्या विधानसभेत निवडणूकीत विजयाची माळ गळ्यात पडलेल्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप हे तीनही आमदार यंदा पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. तसेच पक्षांतर करणारे बाळासाहेब सानप यांनी विधानसभेचा राजीनामा देत निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य आणि देवळाली अशा चारही मतदारसंघांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष  लागले आहे. 

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती. पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णय मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

नाशिक शहरात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार मतदारसंघ असून, यंदा सर्वच मतदारसंघांत विशेष चुरस पहावयास मिळाली. २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य या तीन मतदारसंघांवर मनसेने प्रथमच झेंडा फडकावला होता. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्या नव्या पक्षाच्या भावनेवर नाशिककर स्वार झाले होते. २०१४मध्ये अशाच प्रकारे मोदी लाटेच्या भावनेवर स्वार होत तिन्हीमतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार नाशिककर जनतेने निवडून दिले होते. यंदा भाजपा बरोबरच शेवटच्या टप्प्यात राष्टÑवादीनेदेखील जोरदार प्रयत्न केल्याने लाट की परिवर्तन हे मतदारांच्या कौलनंतर स्पष्ट होणार आहे.नाशिक पूर्वमध्ये भाजपामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मनसेतून आलेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांना अचानक उमेदवारी देण्यात आली तर उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे शहराध्यक्ष व विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी मनगटावर थेट ‘घड्याळ’ बांधत कमळाचे उपरणे उतरवून ठेवले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. परंतु मतदान झाल्यानंतरदेखील कोणीच या मतदारसंघाविषयी खात्री देऊ शकत नाही, इतकी चुरस यंदा निर्माण झाली. नाशिक मध्यमध्ये भाजपाच्या उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी सहज मिळाली. मात्र कॉँग्रेस- राष्टÑवादी आणि मनसे असे उभय पक्षांचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले. त्यातच सर्वच पक्षात फाटाफूट झाली. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने मध्य नाशकात गेला असेल, याविषयीची उत्कं ठा अधिकच वाढली आहे. फरांदे यांना मनसेकडून माजी आमदार नितीन भोसले तर कॉँग्रेसकडून गटनेता हेमलता पाटील यांच्या विशेष आव्हानाला सामोरे जावे लागले.

नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा सर्वाधिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर मित्रपक्ष शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी बंड पुकारून थेट आव्हान दिले. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडेही नाशिकसह अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. शिवसेनेकडूनच बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना पुरस्कृत केले असल्याचे चित्र उभे राहिले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामा देऊन वापरलेल्या दबावतंत्रानंतर भाजपानेदेखील त्यांच्या भरवशावर न राहतास्वबळावरच या मतदारसंघात निवडणूक लढविली. तथापि, राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांचीच नव्हे तर सर्वचउमेदवारांची दमछाक केली. त्यातच मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांच्या उमेदवारीनेदेखील या मतदारसंघात वेगळीच रंगत आणली. देवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांपैकी विद्यमान आमदार डॉ. योगेश घोलप यांना तीस वर्षांत प्रथमच तुल्यबळ आव्हान उभे करण्यात विरोधकांना यश मिळाले, असे सांगितले जाते. भाजपाच्या नगरसेविका असलेल्या डॉ. सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करताना घोलप यांची दमछाक बऱ्यापैकी केली.

मतदानाची टक्केवारी धाकधूक वाढविणारी..नाशिक शहरात देवळाली मतदारसंघाचा अपवाद वगळला तर अन्य तीन मतदारसंघांत२०१४च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात घसरली आहे. नाशिकपूर्वमध्ये ५२.६८ मध्ये ५२.३८ टक्के इतके मतदान होते. यंंदा ते ५०.६६टक्के इतके झाले. नाशिक पश्चिममध्ये २०१४ मध्ये ५१.७३ टक्के मतदान होेते.यंदा ते ५४.३४ टक्के इतके झाले. नाशिक मध्य मतदारसंघात तर जिल्ह्यातनिच्चांकी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.७३ टक्के इतकेमतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ४८.४० म्हणजे तीन टक्क्यांनी मतदानकमी झाले आहे. घसरलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे गुरु वारीनिकालानंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्य