नाशिक जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:00 AM2019-08-04T02:00:41+5:302019-08-04T02:01:05+5:30

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Nashik District | नाशिक जिल्ह्यात कोसळधार

गोदावरी नदीला पूर आल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीसह बहुतांश मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

Next
ठळक मुद्दे४१५ मिलिमीटर पाऊस , नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; ६० जणांना हलविले सुरक्षितस्थळी

नाशिक : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात तब्बल १७१ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरीला पूर आला असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण ८७ टक्के, तर दारणा ८८ टक्के भरले आहे. शनिवारी (दि. ३) गंगापूरमधून १७ हजार ७४८ हजार, दारणातून २३ हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून, नांदूरमधमेश्वरमधून मराठवाड्याला जायवाडी धरणासाठी तब्बल ८३ हजार ७७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गोदावरी व दारणेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरीच्या पुरामुळे दुतोंड्या मारुती बुडून रामसेतूवरूनही पाणी गेले. तर दारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने लहवीत-वंजारवाडी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला होता. खबरदारीचा उपाय म्हणून येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकसह, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार श्रावणसरी कोसळल्या असून, पावसाचा जोर वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सायखेडा गावातील सुमारे ६० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर व दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूर धरणांची पातळी वाढली असून, दोन्ही धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला या पावसाळ्यातील सर्वांत मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने शनि२९वारी सकाळी ९ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेल्या ११ हजार क्यूसेकचा विसर्ग दुपारी १ वाजता १३ हजार, तर दुपारी २ वाजता १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला, धरणसाठ्यात वाढ सुरूच असल्याने सायंकाळी ५ वाजता होळकर पुलाखालून तब्बल २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इन्पो-
जिल्ह्णातील धरणातून विसर्ग (क्यूसेक)
गंगापूर : १७ हजार ७४८
गौतमी गोदावरी : ६ हजार २२५
आळंदी : ६८७
दारणा : २३ हजार १९२
भावली : १ हजार ५०९
वालदेवी : ५०२
नांदूरमधमेश्वर : ८३ हजार ७७३.
पालखेड ५ हजार ३०७
चनकापूर : ७ हजार ३०७
पूनद : २८९५ क्यूसेक
हरणबरी ५६ क्यूसेक
होळकर पूल : २० हजार ३७५

——



इन्फो-
दिवसभरातील तालुकानिहाय पाऊस
नाशिक जिल्ह्णात शनिवारी (दि.३) सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक त्र्यंबकेश्वर तालुक्यात १७१ मिलीमीटर पाऊस कोसळला असून, नाशिकमध्ये २१.१, इगतपुरी ४०, दिंडोरी ३१, पेठ ७६ व सुरगाण्यात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर चांदवडमध्ये अवघा दोन व कळवणमध्ये एक मिलीमीटर पाऊस पडला असून, सिन्नर, देवळा, येवला, नांदगाव या तालुक्यांसाठी शनिवारचा दिवस कोरडाच गेला.

Web Title: Nashik District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.