नाशिक जिल्ह्याला मिळाला कोरोना लसींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:29 IST2021-04-26T01:28:58+5:302021-04-26T01:29:40+5:30
जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झालेला साठा कमी असल्याची माहिती मिळाली.

नाशिक जिल्ह्याला मिळाला कोरोना लसींचा साठा
नाशिक : जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झालेला साठा कमी असल्याची माहिती मिळाली.
महानगरपालिकेची लसीकरणाची २९ केंद्रे असूनही शहरातदेखील केवळ दोन रुग्णालयांमध्येच लसीकरण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याला कोविशिल्ड, तसेच कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या आठवड्यापासून बहुतांश नवीन डोस घेणाऱ्यांना कोविशिल्ड उपलब्ध होणार आहे, तर दुसरा डोस ज्यांचा असेल त्यांना पहिली लस ज्या कंपनीची दिलेली असेल तीच लस दुसऱ्यावेळी देण्यात येणार आहे. दरम्यान नागरीकांनी लसीकरणासाठी जाण्यापूर्वी केंद्रावर संपर्क करून नंतरच लस घेण्यासाठी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.