Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

By संजय पाठक | Updated: July 15, 2023 10:04 IST2023-07-15T10:03:49+5:302023-07-15T10:04:33+5:30

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आज सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.

Nashik: Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed in Nashik | Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

- संजय पाठक
नाशिक -  उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आज सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असून त्यासाठी आज  वंदे भारत एक्सप्रेस मधून त्यांचे आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या तसेच पुष्पवृष्टी करण्यात आले.

नाशिक रोड येथिल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी अजित पवार यांच्यावरही क्रेन मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच नाशिकरोड येथून नाशिक पर्यंत वाहनांच्या ताफ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅली ही काढली आहे.

आज स्वागत कार्यक्रमाच्या वेळी माजी खासदार समीर भुजबळ,  आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

Web Title: Nashik: Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed in Nashik