नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:25 IST2019-06-26T00:23:19+5:302019-06-26T00:25:50+5:30
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत.

नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी
नाशिकरोड : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत.
गेल्या सात वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत सायकल रॅली काढली जाते. तीन दिवसांत होणाऱ्या सायकलवारीमध्ये सातशे सायकलिस्ट गावांमध्ये जनजागृती करणार आहेत. सायकल रॅलीची सुरुवात शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून होणार असून, अहमदनगरला मुक्कामी थांबणार आहे. दुसरा दिवशी रूई छत्तीसी, करमाळा मार्गे टेंभुर्णी येथे मुक्काम करून तिसºया दिवशी टेंभुर्णीहून ६० किमीचा प्रवास करत दुपारी पंढरपुरात दाखल होतील.
सायकल रिंगण
सायकलिस्ट पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात सायकल रिंगण घालणार आहे. सायकल वारीमध्ये ८ वर्षांपासून ७३ वर्षीय सायकलिस्ट वारकरी सहभागी होणार आहेत.
सायकल हा नाशिकचा ब्रॅँड होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळा सामाजिक संदेश देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सायकलवारी निघणार आहे. सायकलवारीत सर्व जातीधर्माचे सायकलिस्ट मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.
- प्रवीण खाबिया, अध्यक्ष, सायकलिस्ट असोसिएशन