शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मॅपवर प्राचीन मंदिरे शोधली अन् सुरु केली लुटमार; हायटेक चोराच्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:36 IST

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाभरात मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या हायटेक चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime: 'गुगल मॅप'वरून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचा शोध घेतला अन् तत्पूर्वी यु-ट्यूबवरून हायड्रोलिक कटर चालविण्याच्या तंत्राचे धडे घेत एका मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सराईत गुन्हेगाराने चौघांच्या मदतीने सात मंदिरांची कुलूपे कापली होती. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व गुन्हे उघडकीस आणून म्होरक्यासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सिन्नर शहरासर आजूबाजूच्या परिसरातील चार मंदिरांत तसेच निफाड, लासलगाव, वाडीव-हे येथील प्रत्येकी एक अशा एकूण सात मंदिरांच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप कापून चोरांनी देव-देवतांच्या मूर्तीवरील चांदीचे मुकूट, पितळी घंटा, पितळी समई, साधारणतः चार फूट लांबी व २० किलो वजनाचा पितळी कळस अशा धातूच्या वस्तू चोरट्यांनी पळवल्या होत्या. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या कालावधीत घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नव्हती. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संगमनेर, टिटवाळा, चाकण एमआयडीसी याठिकाणी जाऊन मुख्य सूत्रधार मेकॅनिकल इंजिनिअर सराईत गुन्हेगार सुयोग अशोक दवंगे (२१, रा. संगमनेर), संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (२३, रा. टिटवाळा), अनिकेत अनिल कदम (२१, रा. टिटवाळा) यांना शिताफीने पकडले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ६६ किलो पितळी धातूच्या सुमारे ६६ हजार २९० रुपयांच्या वस्तू, तसेच १ लाख २७ हजार रुपये किमतीच्या १२३८ ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. इतर दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

मंदिरांमध्ये चोरी केलेल्या धातूच्या वस्तूंची विक्री करून त्यातून मिळालेला पैसा शेअर मार्केटमध्ये आरोपींकडून गुंतवणूक केला जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यातील काहींनी स्वतःच्या चैन व मौजेसाठी पैशांचा वापर केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या गुन्ह्यामधील सराईत आरोपी एकमेकांना कारागृहामध्ये यापूर्वी भेटल्याचे समोर आले. कारागृहातच त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी चोरीचा कट आखला. महत्त्वाची  बाब म्हणजे टोळीचा म्होरक्या सुयोग दवंगे याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात १७पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस