शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी; तापमानाचा पारा १०.२अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 15:59 IST

सकाळी आठ वाजता हवामान निरिक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२अंशापर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता

ठळक मुद्देहवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पाणी उकळून पिण्याचा डॉक्टरांकडून सल्ला पुढील काही दिवस थंडीची लाट

नाशिक : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली होती. त्यानंतर नाशिककरांना पुन्हा आठवडाभराने गुरूवारी (दि.९) थंडीचा कडाका सहन करावा लागला. किमान तापमानाचा पारा थेट १०.२ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली. या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. मागील बुधवारी १०.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या हंगामात पुन्हा तीसऱ्यांदा राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून, नागरिकांना मागील दोन आठवड्यांपासून थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. नव्या वर्षाचा मागील आठवड्यातही शहर गारठलेले होते. या आठवड्याच्या मध्यावर पुन्हा थंडीची लाट शहरात आल्याने नागरिकांकडे उबदार कपड्यांचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बुधवारी संध्याकाळनंतर वातावरणात गारवा अचानकपणे निर्माण झाला होता. मध्यरात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने गुरूवारी पहाटे थंडीचा चांगलाच कडाका नाशिककरांना अनुभवयास आला. सकाळी आठ वाजता हवामान निरिक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२अंशापर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता. यामुळे कार्यालयांमध्ये काम करणा-या नोकरदारवर्गाने उबदार कपडे दिवसभर परिधान करणे पसंत केले. वाढत्या थंडीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून, किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारतासह उत्तर महाराष्ट, विदर्भ, मराठवाड्याच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी पुन्हा नाशिकमध्ये झाली. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पारा १३ अंशापर्यंत मोजला गेला. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेत उपचार घ्यावा, असेही जगदाळे म्हणाले.आरोग्यावर परिणामथंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य पदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी परिधान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.----

 

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमानHealthआरोग्य