नाशकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; विनयभंगाच्या तीन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:38 IST2019-11-04T14:33:52+5:302019-11-04T14:38:55+5:30
गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे विविध प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नाशकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; विनयभंगाच्या तीन घटना
नाशिक : शहरातील गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे विविध प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर गावातील क्रांती चौकात शनिवारी (दि.२) दोन संशयितानी एका मुलीचा रस्ता अडवून विनयभंग केल्याची घटना घडली. रस्त अडवणाऱ्यांपैकी एकाने पिडित मुलीला स्पर्श करून तर दुसऱ्या आरोपीने धक्का मारून पिडितेच्या मनता लज्जा उत्पन्न होईल असे वर्त करून मुलीचा विनयभंग केला. तर गंगापूर परिसरातील आनंदवली शिवारातील दुसºया घटनेत संशयित आरोपी अमोल दौंड या रीक्षाचालकाने दवाखान्यात काम करणाऱ्या एका महिलाचा पाठलाग करून विनय भंग केल्याचा प्रकार घडला. दौंड याने पिडितेला रीक्षाचा कट मारून महिलेकडे प्रेमसंबध ठेवण्याची मागणी करीत नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पिडित महिला दवाखान्यात काम करीत असताना पाठीमागून अचानक जाऊन महिलेचा विनयभंग केला. या दोन्ही घटनांमधील पिडित महिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादींवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अनुक्रमे सहायक पोलीस निरीक्षक बैसाने व पोलीस उपनिरीक्षक सचीन शेंडेकर या दोन्ही विनयभंगाच्या प्रकरणांचा तपास करीत आहेत.
प्रतिकार करणाऱ्या महिलेवर हल्ला
बोधलेनगर परिसरातील तपोवनरोड येथील एका महिलेचा तीच्या पूर्वीचा संशयित आरोपी मित्र चेतन दगडू जंगम (३४) याने पिडित महिलेच्या राहत्या घरी जाऊन तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपीने पिडितेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला असता जंगम याने त्याच्याकडूल चॉपरने पिडितेच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला असून पोलीस हवालदार पगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.