नाशिक शहरातील दर गुरूवारची पाणी कपात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:40 IST2019-07-15T19:34:08+5:302019-07-15T19:40:34+5:30
नाशिक- गंगापूर धरणात पाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

नाशिक शहरातील दर गुरूवारची पाणी कपात रद्द
नाशिक-गंगापूर धरणातपाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
महापालिकेत सोमवारी (दि.१५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानस यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही त्यातच धरणातील जलपातळी खालावली आणि निम्न पातळीवर पाणी घेणे शक्य नाही. त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट ओढवले. जुलै पर्यंत तरी शहराला पाणी पुरवठा होईल का अशी शंका निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी देखील केली होती.
शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो तो एकवेळ करण्यात आला. त्याच प्रमाणे पावसाने ओढ दिल्यानंतर दर गुरूवारी ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस पाळुन पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभी पासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील ५३ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे.