शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान

By संकेत शुक्ला | Updated: January 10, 2024 17:25 IST

Girish Mahajan News: माजी पालकमंत्री छगन भुजबळ ओबीसी आंदोलन चळवळीत अडकल्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर नाही. मात्र त्यांची आणि आमची यावर चर्चा होत असते अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

- संकेत शुक्लनाशिक - माजी पालकमंत्री छगन भुजबळ ओबीसी आंदोलन चळवळीत अडकल्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर नाही. मात्र त्यांची आणि आमची यावर चर्चा होत असते अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जप्तीची नोटीस आल्याबद्दल आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगीतले. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्येच तळ ठोकून असलेल्या आ. गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची कामानिमित्त भेट का होवू शकत नाही असा प्रश्न विचारून यावर शंका व्यक्त करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. कोणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दिपक केसरकर आणि राज ठाकरे भेटीलबद्दल बोलणे गैर आहे, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला बँकेने जप्तीची नोटीस दिली आहे यावर विचारले असता त्याबाबत आपल्याला माहित नसल्याचे सांगत त्यावर महाजन यांनी भाष्य टाळले, तर माजी पालमकमंत्री छगन भुजबळ नाशिकमधील पंतप्रधानांच्या कार्यक्रम नियोजनास उपस्थित का नाहीत असे विचारले असता ते ओबीसी संघटनेच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे महाजन यांनी सांगीतले. जरांगे पाटील यांना मुंबईत यावे लागणार नाहीमराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही. कायदा सुव्यवस्थेबाबत अजीतदादांनी केलेल्या विधानाबाबत आपण काही बोलणार नाही. मात्र तशी वेळ येणार नाही असेही महाजन म्हणाले. - त्र्यंबकेश्वर पर्यटन कॅरिडॉरसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रसरकार त्याला मान्यता देईल अशी अपेक्षा आहे.- पेपर फुटीसाठी खोडसाळ विद्यार्थी कारणीभूत आहेत. सरकारने हा मुद्दा गांभिर्याने घेतला आहे.- पेट्रोल वाहतूकदारांचे आंदोलन झाले तरी इंधन बंद होणार नाही याची काळजी घेऊ, हा प्रश्न सकारात्मक हाताळू.- कांदा उत्पादकांशी चर्चा झाली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल.- राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजप जिंकणार.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनChhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक