Nashik: पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत महाजन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिंदेसेनेला नमवण्यात भाजपला यश

By संजय पाठक | Updated: January 19, 2025 15:15 IST2025-01-19T15:15:01+5:302025-01-19T15:15:29+5:30

Nashik News:  ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्याबाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे या देाघांवर मात करून भाजपाने गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली

Nashik: BJP succeeds in defeating NCP, Shinde Sena through Mahajan in the contest for the guardian ministership | Nashik: पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत महाजन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिंदेसेनेला नमवण्यात भाजपला यश

Nashik: पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत महाजन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिंदेसेनेला नमवण्यात भाजपला यश

- संजय पाठक
नाशिक -  ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्याबाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे या देाघांवर मात करून भाजपाने गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परीषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाजी मारली आहे. विशेष म्हणजे माणिकराव कोकाटे यांना तरी नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत. मात्र,नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूका झाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यावेळी मंत्री मंडळात समावेश हेाऊन नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे सेनेचे दादा भुसे यांच्यात स्पर्धा असली तरी गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गिरीश महाजन यांना पक्षाने नाशिकपासून दूर ठेवले होते. मात्र, पक्षीय स्तरावर ते नाशिकला विविध कार्यक्रमांसाठी येतच हेाते. मात्र, राज्यात निवडणूका झाल्यानंतर अचानक नाट्यमयरीत्या छगन भुजबळ यांचे नाव मंत्रीमंडळातून वगळले गेले. अर्थात, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रीपदासाठी इच्छा प्रबळ झाली. त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असेही म्हंटले होते मात्र, नाशिकला गिरीश महाजन यांनाच नियुक्त करून  ॲड. माणिकराव कोकाटे यानाही पर जिल्ह्यात म्हणजे नंदूरबारचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

Web Title: Nashik: BJP succeeds in defeating NCP, Shinde Sena through Mahajan in the contest for the guardian ministership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.