नाशिक : पहाटे साडेतीन वाजता साखर झोपेतून जागे होत ‘कमांड’चे पालन करुन स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४२ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण कठोर परिश्रम घेऊन पुर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक म्हणून घडविले एकूण ४६२ गणरच्या तुकडीने लष्करी थाटात भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज राहण्याची शपथ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.
नाशिक तोफखाना केंद्र : ४६२ नवसैनिकांच्या तुकडीने घेतली देशसेवेची शपथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:05 IST
देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.१७) पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव उपस्थित होते.
नाशिक तोफखाना केंद्र : ४६२ नवसैनिकांच्या तुकडीने घेतली देशसेवेची शपथ !
ठळक मुद्दे तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा ४२ आठवड्यांचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण पुर्ण