नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:37 IST2018-04-15T16:33:11+5:302018-04-15T16:37:10+5:30

नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या सुमारास घडली़

nashik, ayyappa,temple,donation, box,theft | नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली

नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली

ठळक मुद्देशनिवारी रात्रीच्या सुमारास घटना

नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या सुमारास घडली़

चेरियिल रामय्यन राजप्पन (६५, गुरुतिर्थ, नाशिकरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार द्वारका परिसरातील डॉ़ जाकीर हुसेन दवाखान्याजवळ अयप्पा मंदिर आहे़ शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अयप्पा मंदिरातील दानपेटीचा पत्रा उचकटून त्यातील रक्कम चोरून नेली़

या चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, महिला पोलीस उपनिरीक्षक व्हीक़े़शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik, ayyappa,temple,donation, box,theft