Nashik: लोहोणेरला चार वाहनांच्या अपघातात एक ठार
By प्रसाद गो.जोशी | Updated: November 15, 2023 00:08 IST2023-11-15T00:06:22+5:302023-11-15T00:08:18+5:30
Nashik Accident : लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर आज सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान क्रीटा व सिफ्ट या दोन कार व स्कुटी व डिस्कवर या दोन दुचाकी अशा चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात स्कुटी वरील वाहन चालक कळवण येथील सागर देवरे हे जागीच ठार झाले.

Nashik: लोहोणेरला चार वाहनांच्या अपघातात एक ठार
- पंडित पाठक
लोहोणेर - येथील गिरणा नदी पुलावर आज सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान क्रीटा व सिफ्ट या दोन कार व स्कुटी व डिस्कवर या दोन दुचाकी अशा चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात स्कुटी वरील वाहन चालक कळवण येथील सागर देवरे हे जागीच ठार झाले.
अपघातात ठेंगोडा येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे हिला कमरेला मार लागल्याने सटाणा येथील खाजगी दवाखान्यात उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. अपघात ग्रस्त स्कुटी वरील व्यक्तीचा तपास लागला असून अपघात ग्रस्त डिस्कवर मोटरसायकल व कार मधील व्यक्तीचा तपास लागला नसून देवळा पोलीस या अपघाता बाबत पुढील तपास करीत आहेत. अपघातामुळे गिरणा नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने हलविण्यानंतर वाहतूक सुरळीत चालू केली. याबाबत देवळा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.