नाशिक हादरले: महिलेच्या अंगावर गुंगीचं औषध टाकत चिमुकलीची गळा चिरून हत्या

By नामदेव भोर | Updated: March 21, 2023 14:16 IST2023-03-21T14:14:24+5:302023-03-21T14:16:18+5:30

पोलिसांनी चिमुकलीच्या मारेकऱ्याचा शोध सुरू केलाय.

Nashik A little three months old girl killed she is killed by putting medicine on the womans body | नाशिक हादरले: महिलेच्या अंगावर गुंगीचं औषध टाकत चिमुकलीची गळा चिरून हत्या

नाशिक हादरले: महिलेच्या अंगावर गुंगीचं औषध टाकत चिमुकलीची गळा चिरून हत्या

नाशिक : शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्रुवनगर परिसरात एका महिलेच्या अंगावर गुंगीचे औषध फवारून अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने नाशिक शहर हादरेले असून ही घटना आघोरी प्रकार आहे, की अनैतिक संबंध अथवा कौटुंबीत वादातून घडली याविषयी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी चिमुकलीच्या मारेकऱ्याचा शोध सुरू केलाय.

ध्रुवनगर परिसरात चिमुकलीची गळा चिरून हत्या झाल्याची घटना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयत चिमुकलीच्या आईने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या तीन महिन्यांच्या मुलीचा अनोळखी महिलेने गळा चिरून हत्या केली.  ही घटना गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात मध्यरात्री घडली. अनैतिक संबंध व कौटुंबीक वादातून ही धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी यामागे अघोरी विद्येचा प्रकार असावा का असा शंशयही व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे याप्रकरणात पोलिसांकडून आईसह अन्य नातलगांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान्देशातील हे कुटुंब गंगापूर रोड येथील ध्रुवनगरात वास्तव्यास आहे. दरम्यान, मुलीच्या आईने तिच्या आईने एका महिलेवर चिमुकलीचा गळा चिरून हत्या केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी रात्री मुलगी आणि ती

Web Title: Nashik A little three months old girl killed she is killed by putting medicine on the womans body