शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नाशिक @७.६,नाशिककर गारठले : सातत्याने किमान तपमानात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 2:02 PM

सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली

ठळक मुद्देसोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली हंगामात ७.६ हे सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले

नाशिक : शहराचा किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीची लाट शहरासह जिल्ह्यात कायम आहे. गेल्या सहा दिवसांपासून तपमान दहा अंशांच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककर गारठले आहे. शुक्रवारी (दि.२९) शहराचे किमान तपमान ७.६ इतके नोंदविले गेले.गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी थंडीची तीव्रता आणखीच वाढलेली दिसून आली. किमान तपमानाचा पारा काही अंशी खाली सरकल्याने हवेतील गारव्यात वाढ पहायला मिळाली. गेल्या सहा दिवसांपासून किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागला आहे. यामुळे थंडीची तीव्रता शहरात वाढली आहे.७.६ इतके तपमान शुक्रवारी नोंदविले गेल्याने हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. थंडीचा कडाका वाढू लागल्याने रात्री ८ वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकूणच विदर्भानंतर उत्तर महाराष्टÑात नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे. सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली राहत असून, शहरात थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिककर गारठले आहेत. हंगामात ७.६ हे सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. एकूणच उत्तर भारतात आलेल शीतललहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर, चहा, सुप सारख्या गरम पदार्थांच्या सेवनावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेक ोट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये होत होती. किमान तापमानाचा पारा ९ अंशांच्या जवळपास राहत असल्यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक