शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

By दिनेश पाठक | Published: April 17, 2024 11:33 AM

Nashik Onion Market News: लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून ये

- दिनेश पाठक नाशिक - लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात कामकाज पूर्ववत सुरू न झाल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार निबंधक फय्याज मुलानी यांनी दिली. 

बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असताना देखील मंगळवारी चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच हाेते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडला जात आहे. दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि.१७) देखील सकाळी १३ बाजार समित्यांमध्ये कांदा व इतर शेतीमालाची विक्री सुरू झाली नव्हती. सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांदा काढण्यास सुरूवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हात कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो कांदा घेऊन येऊ शकत नाही.बाजार समित्यांचे आदेशही धाब्यावरबंदचा परिणाम बाजार समितीच्या उत्पनावर होत असून व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासक व सहकार विभागाने देऊनही व्यापारी आदेश धाब्यावर बसवित असल्याचे दिसून येते. समन्वयातून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कांदा व्यापाऱ्यांची चौकशी सुरूचबाजार समित्यांमध्ये प्रचलित पद्धतीने कांदा खरेदीचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आदेश घुडकावत कांदा व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलेल्या कांदा लिलाव प्रकरणी मंगळवारी (ता.१६) देखील जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या १२ पथकांनी ठिकठिकाणी जात चौकशी करत तपासणी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

परवाने नसताना बाहेर परस्पर खरेदीव्यापाऱ्यांनी आतमध्ये बंद पुकारला असताना काही ठिकाणी मात्र कांदा व इतर शेतमाल बाहेरच्या बाहेर खरेदी केला जात असल्याचे उघड झाल्यावर अशा व्यापाऱ्यांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे. खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू केले. विनापरवानगी सुरू झालेली ही केंद्रे बेकायदा असून, त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदने जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती. त्या अनुशंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी सुरू होताच काही ठिकाणी बाहेरच्या बाहेर सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली. बागलाण, वणी (ता. दिंडोरी), अंदरसूल (ता. येवला) उमराणे (ता. देवळा), सायखेडा (ता. निफाड) आदी ठिकाणी खासगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकonionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र