शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीच्या अवनखेडचे नरेंद्र जाधव ठरले ‘सरपंच आफ द इयर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:46 IST

जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले.

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या 13 सरपंचांना ह्यलोकमत सरपंच अवॉर्डह्णने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. 'जो गावची शान, त्याचाच हा बहुमान' असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने 'सरपंच अवॉर्डह्णचा अभिनव उपक्रम राज्यभर सुरू केला. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हा सोहळा मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील 'रॉयल हॉल'मध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, वनधिपती विनायकदादा पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील, अर्चना जतकर, बीकेटीचे अ‍ॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या गावाचे सरपंच नरेंद्र कोंडाजीराव जाधव हे ‘सरपंच आॅफ द इयर’ ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अवनखेड गावात त्यांनी भाडेतत्वावरील जागेतील ग्रामपंचायत कार्यालय स्वतंत्र वातानुकूलित प्रशासकिय इमारतीत स्थलांतरीत केले. विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीद्वारे शालेय बस सुरू केली. संपुर्ण गाव हगणदारीमुक्त केले. तसेच गटारद्वारे सांडपाण्याचे व्यवस्थापन केले. डस्टबीनचे गावात वाटप केले. जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले. अवनखेड गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणले. ग्रामपंचायत, जिप शाळा अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळवून दिले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने त्यांना ‘सरपंच आॅफ द इयर’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Nashikनाशिक