शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नांदूरमध्यमेश्वर : नाशिकमध्ये पक्षी निरिक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:11 IST

यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी पक्षी संमेलनवन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार . १९जानेवारीपासून संमेलनाला प्रारंभ शाळांना संमेलन मोफत
नाशिक : देशी-विदेशी स्थलांतरीत पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीन दिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे.नाशिकपासून तीस किलोमीटरील चापडगाव पक्षी निरिक्षण केंद्र नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यात पहावयास मिळते. यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.शाळा-महाविद्यालयाच्यां विद्यार्थ्यांना पक्ष्यांची जैवविविधता लक्षात यावी, जेणेकरून निसर्गाचा दागिणा असलेल्या पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल, या उद्देशाने प्रथम पक्षी संमेलन आयोजित करत असल्याची माहिती वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनप्रमुख सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे उपस्थित होते. १९जानेवारीपासून संमेलनाला प्रारंभ होणार आहे. वनविभागाच्या मुख्य अधिका-यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटनाचा सोहळा संपन्न होणार आहे.तीन दिवस चालणाºया या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमीत दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. संमेलनासाठी वन्यजीव विभागाकडून http://www.birdfestival.nashikwildlife.comहे सविस्तर माहितीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. संमेलनासाठी नियमितपणे वाहनतळ व प्रवेश शुल्कात कोणतीही सुट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.असे असेल संमेलनसकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरिक्षण शिवार फेरी.सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यानदुपारच्या सत्रान पक्षी छायाचित्रण, निरिक्षणाविषयी तज्ञ्जांचे मार्गदर्शन शिबिर.अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धानिसर्गप्रेमी स्वयंसेवी संघटनांना आवाहनतीन दिवसीय संमेलनासाठी वन्यजीव विभागाला सहकार्यासाठी शहरातील विविध निसर्गप्रेमी स्वयंसेवी संघटनांना वन्यजीव वनसंरक्षकांकडून आवाहन करण्यात आले आहे. स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवी कार्यासाठी इच्छुक असलेल्या संघटनांच्या पदाधिकाºयांनी वन्यजीव कार्यालयाशी संपर्क साधावा. संमेलनामध्ये सहकार्य करणाºया स्वयंसेवकांना रविवारी (दि.२१) समारोपप्रसंगी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.शाळांना संमेलन मोफततीन दिवसीय पक्षी संमेलन शहरासह निफाड तालुक्यातील शाळांना मोफत असणार आहे. शहरातील काही प्राथमिक शाळा प्रथम नोंदणीस प्रथम प्राधान्यानुसार तीन दिवस सकाळच्या सत्रात वन्यजीव विभागाकडून मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे शुल्क शालेय संस्थांना भरावे लागणार नसल्याचेही वनसंरक्षक प्रवीण यांनी स्पष्ट केले.
टॅग्स :Nashikनाशिकbirds sanctuaryपक्षी अभयारण्यnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरnifadनिफाडwildlifeवन्यजीव