शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नांदगावी सब-वेने घेतला पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 01:27 IST

रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठरली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून प्रशासकीय व राजकीय अनास्थेने तिचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअपघात : रेल्वे रुळ ओलांडताना विवाहितेचा मृत्यू

नांदगाव : रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठरली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून प्रशासकीय व राजकीय अनास्थेने तिचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळी मुलींना घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनासाठी रेल्वे लाईन ओलांडताना स्वाती रवींद्र शिंदे (३०) या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाला. स्वातीच्या मृत्यूने संतप्त शेकडो नागरिकांनी रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन प्रबंधक विश्वजित मीना यांना दोन तास धारेवर धरल्याने तणाव निर्माण झाला. ठोस आश्वासन मिळाल्यावरच स्वातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली. नागरिक आणि रेल्वे प्रशासन यांच्यात तोडगा काढतांना, सब वे मधले पाणी उपसण्यासाठी पंप गरजेनुसार सातत्याने सुरू राहतील. अप व डाऊन या दोन्ही लोहमार्गावर पादचारी क्रॉसिंगच्या ठिकाणी गाडी येण्याचा इशारा देणारे बझर सात दिवसात कार्यान्वित करण्यात येतील. क्रॉसिंगच्या जागी रेल्वे पोलीस तैनात करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मीना यांनी दिले.

पूर व नियोजनशून्य सब-वे मुळे शहराचे विभाजन झाले असून दैनंदिन गरजांसाठी दोन्ही बाजूंकडे आवागमन करणाऱ्या दहा हजार नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे सब-वेत पाणी भरल्याने शहरात येण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणे हा एकमेव पर्याय उरला आहे. दुसरा पर्याय चार कि.मी. लांबीचा आहे. घटना घडली तेव्हा अपकडे मालगाडी जात होती. रूळ ओलांडण्याची वाट बघत असलेली स्वाती आपल्या निकिता (१४), नंदिनी (१०), साक्षी (८), सोनू (५) यांना पलीकडे घेऊन जाण्याच्या तयारीत होती. मागचा डबा गेल्याबरोबर तिने डाऊन लाईनवरून मुलीना पास केले. शेवटी सोनूला घेऊन जात असताना अंगावर येणाऱ्या गाडीला चुकविण्यासाठी तिने सोनूला अक्षरश: पलीकडे ढकलले. त्याचक्षणी कर्दनकाळ बनून आलेल्या गाडीचा जोरदार फटका बसून ती कोसळली. तिच्या समवेत सुवर्णा मोरे होती. आधीच गेल्याने ती बचावली. प्रत्यक्षदर्शी नगरसेवक नितीन जाधव व सोमनाथ घोंगाणे सेवाग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

गाडी येत असताना बघून अनेकांनी आरडाओरडा करून स्वातीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु मरणाच्या दारात पोहोचलेल्या स्वातीला तो आवाज ऐकूच आला नाही. दुकानात काम करणारा व रिक्षाने विद्यार्थी पोहोचवणारा तिचा पती रवींद्र शिंदे याचा आक्रोश सर्वांचे मन हेलावून गेला. मुलींच्या दु:खाला पारावार उरला नाही.

 

इन्फो

केंद्रीय मंत्री पवार यांच्याकडून कानउघाडणी

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मोबाईलवरून संपर्क साधून कडक शब्दात प्रबंधक विश्वजित मीना यांची कानउघाडणी करून त्यांना नागरिकांची सोय तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. मीना यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत महावीर जाधव, विश्वास अहिरे, सुनील जाधव, भरत पारख, शंकर विसपुते, तुषार पांडे, सुनील सोर, सुनील नेग्णार, दत्तू आवारे, सौदागर आदींनी भाग घेतला.

            

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू