नांदगाव सदोला काळा भातलागवडीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:55 IST2021-05-30T22:41:24+5:302021-05-31T00:55:36+5:30
नाशिक : खरीप हंगामात भातलागवडीपूर्वी बीज प्रक्रियेबाबत कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके दाखवून मार्गदर्शन केले जात असून इगतपुरी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नांदगाव सदो येथे बीज प्रक्रिया प्रात्याक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.

नांदगाव सदोला काळा भातलागवडीबाबत मार्गदर्शन
नाशिक : खरीप हंगामात भातलागवडीपूर्वी बीज प्रक्रियेबाबत कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके दाखवून मार्गदर्शन केले जात असून इगतपुरी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नांदगाव सदो येथे बीज प्रक्रिया प्रात्याक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती भगवान आडोळे, नंदलाल भागडे, कृषी सहायक शरद वाघ दीपक भालेराव, रावसाहेब जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भातलागवडीपुर्वी बीज प्रक्रिया, गिरीपुष्पाचा वापर, काळा भातलागवड एसआरटी पद्धतीने भातलागवड आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.