नांदगावी शेतकरी अन्नदाता सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:43 IST2020-12-23T18:42:47+5:302020-12-23T18:43:10+5:30
नांदगांव : त्याग, समर्पण आणि वीरता यांचे प्रतिक असणारे शेतकरी बांधव सर्वांसाठी ईश्वराचे स्वरूप आहेत. शेती ही मानवी सभ्यतेची व संस्कृतीची जुनी परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेत महिंद्रा कंपनी शेतकरी बांधवाच्या या समर्पणाला आणि वीरतेला मानवंदना देत व शेतकरी बांधवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करित अन्नदाता सत्कार सोहळा पार पडला.

याप्रसंगी शामराव सोनस, राजेंद्र मवाळ, युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख, प्रभाकर काकळीज, राजेंद्र करवर, पुंडलिक बोगीर, मनोहर पवार, नजेंद्र तळेकर, नितीन बच्छाव, संदिप जाधव, संतोष बोडखे, आनंद सुरसे आदिंसह तालुक्यातील शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी उल्हास कदम, नंदकिशोर बोगडे, राजेंद्र घोटेकर, दत्तू आवारे, रविंद्र रोकडे आदिंनी परिश्रम घेतले.
येथील महिंद्रा टॅक्टर्स व कृषीभुषण टेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आबासाहेब सोमवंशी व नवनाथ सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कृषीदिन साजरा करण्यात आला.