नांदगावी रसायनशास्त्र परिषद
By Admin | Updated: January 22, 2016 22:54 IST2016-01-22T22:47:07+5:302016-01-22T22:54:51+5:30
नांदगावी रसायनशास्त्र परिषद

नांदगावी रसायनशास्त्र परिषद
नांदगाव : रसायनशास्त्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विज्ञानामुळे क्र ांती झाली असून, त्यात रसायनशास्त्राचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक डॉक्टर बापू शिंगाटे यांनी केले. येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजपासून दोनदिवसीय रसायनशास्त्रविषयक राज्यस्तरीय परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी झालेल्या पहिल्या सत्राच्या उद्घाटनपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शिंगाटे बोलत होते. केंद्रीय अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. आर. भाबड अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रा. एम. आर. गवारे, डॉ. पावन तांबडे, संजीव निकम, प्रा. बी. एन. शेळके यावेळी उपस्थित होते.
‘रसायनशास्त्रातील संधी व आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. शिंगाटे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विद्यापीठातील संशोधनातील संधी व आर्गोनिक सिन्थेसिस , नेचरल प्रोडक्ट आणि ड्रग्स आदिबाबत डॉ. शिंगटे यांनी
आपले विचार मांडले. नाशिकच्या के. टी. एच. एम. कॉलेजचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील व डॉ. जे. एस. अहेर यांनी संशोधनातील संधी व टप्पे समजावून सांगताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, अशी अशी अपेक्षा व्यक्त केली. व्ही. व्ही. खन्ना यांनी ड्रग डिस्कव्हरी अॅँड डेव्हलपमेंटबद्दल सखोल मार्गदर्शन केले. मानवी जीवन व रसायनशास्त्र यांच्या परस्पर संबंधाचा आढावा प्राचार्य डॉ. भाबड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात घेतला. चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर पी. जे. तांबडे यांनी प्रास्ताविक केले पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विद्यापीठांतील प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले असून, उद्या परिषदेचा समारोप होणार आहे. प्रा. पी. पी. जमदाडे, श्रीमती पी. एन. जाधव, श्रीमती पी. एन. ठाकरे, प्रा. एल. डी. देढे, भूषण पाटील यांनी संयोजन केले. प्रा. बी. एन. शेळके यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. गवारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)