आजपासून रंगणार लोकमत ‘एनपीएल’चा थरार
By Admin | Updated: January 17, 2016 00:51 IST2016-01-17T00:51:31+5:302016-01-17T00:51:51+5:30
आजपासून रंगणार लोकमत ‘एनपीएल’चा थरार

आजपासून रंगणार लोकमत ‘एनपीएल’चा थरार
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान सज्ज
नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल क्रिकेट सीझन-५ या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रविवार, दि. १७ पासून येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर
रंगणार आहे. क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाचा संचार निर्माण करणाऱ्या या स्पर्धेच्या उद््घाटनानिमित्त मान्यवर उपस्थित राहून पहिल्या रंगतदार सामन्याचा आनंद
घेणार आहेत.
महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, खासदार हरिश्चंद्र
चव्हाण व हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३०
वाजता उद््घाटन सोहळा होणार असून, दहा दिवस चालणाऱ्या या क्रिकेटच्या महासंग्रामाचा क्रीडाशौकिनांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले
आहे. (प्रतिनिधी)