नगरसूल : येवला तालुक्यातील रामवाडी येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावत त्यांचे औक्षण करण्यात आले.प्रारंभी गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. मुख्याध्यापक सोनाली दंडगव्हाळ यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. सायगाव सोसायटीचे चेअरमन विजय खैरनार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर खैरनार, माजी सरपंच गोरख उशीर, अरु ण जानराव, गणपत खैरनार, अंगणवाडी सेविका मंदाकिनी पावडे, अंकुश खैरनार, काशीनाथ बत्तासे, सरला बत्तासे, सुनीता खैरनार, अनिता खैरनार, योगीता खैरनार, विठाबाई उशीर, नितीन गावित आदी उपस्थित होते.
रामवाडी येथे मुलींच्या नावाच्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:39 IST