तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेला टेम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:34 PM2021-06-09T16:34:57+5:302021-06-09T16:40:01+5:30

सिडको : तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला आयशर टेम्पो अंबड पोलिसांनी संशयितासह ताब्यात घेण्याची कामगिरी केली. गेल्या मार्च महिन्यात हा ...

nahsik,tempo,which,was,stolen,three,months,ago,was,taken,into,police,custody | तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेला टेम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात

तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेला टेम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात

Next
ठळक मुद्दे मार्च महिन्यात हा टॅम्पो चोरीस गेला होता.अंबड, दत्तनगर या ठिकाणाहून टेम्पो हस्तगत केला.


सिडको : तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला आयशर टेम्पो अंबड पोलिसांनी संशयितासह ताब्यात घेण्याची कामगिरी केली. गेल्या मार्च महिन्यात हा टॅम्पो चोरीस गेला होता.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणिकनगर परिसरात आयशर टेम्पो हा गेल्या १२ मार्च २०२१ रोजी चोरी झाला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक राकेश शेवाळे यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत शोध सुरू केला होता. यावरून पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मनोहर कोळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दत्तनगर, अंबड येथे सापळा रचून त्यांनी संशयित विशाल अशोक घुले (२५, रा. माणिकनगर, अंबड) याला ताब्यात घेत असतानाच तो टेम्पो सोडून पळून जात होता, त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा मयत साथीदार शुभम शिरसाट (रा. माणिकनगर, अंबड) याच्यासोबत संगनमताने विशाल याने आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच-०४ एफजे-९९९२) चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अंबड, दत्तनगर या ठिकाणाहून टेम्पो हस्तगत केला.

Web Title: nahsik,tempo,which,was,stolen,three,months,ago,was,taken,into,police,custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.