नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने पंचनाम्यांना विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:03 IST2019-11-07T20:02:14+5:302019-11-07T20:03:45+5:30
नाशिक : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे ...

नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने पंचनाम्यांना विलंब
नाशिक: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे पंचनामे करावे लागत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचनामे पुर्ण करण्यात आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५० टक्के पीकांचे नुकसान झाल्याचा म्हणजेच ३ लाख २६ हजार हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले आहे. गाव खेड्यांबरोबरच दुर्गम भागातही पीकांचे मोठे नुकसान झाले आहेच शिवाय नुकसानीची क्षेत्र मोठे असल्यामुळे पंचनामे करतांना काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. शिवाय कर्मचाºयांची संख्याही कमी पडत असल्यामुळे पंचनामे पुर्ण करण्यास अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही. अर्थात पंचनामे हे शनिवार पर्यंत पुर्ण होतील असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पीकांचे पंचनामे करतांना रितसरत वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. याशिवाय जिरायती, बागायती आणि फळपीके अशा तीन टप्प्यात नुकसानीचे पंचनामे करावे लागत असल्यामुळे निर्धारित वेळेत पंचनामे पुर्ण होऊ शकले नाही. शासनाने सहा तारखेपर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. नाशिक जिल्ह्यातील पंचनामे अद्यापही सुरूच आहेत. अत्तापर्यंत १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण झाले असून अजून दिड लाख हेक्टवरील पीकांचे पंचनामे करणे बाकी आहे. दोन दिवसात सर्व पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता आहे.