शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गीतांजली एक्सप्रेसपुढे माय-लेकीने उडी घेत संपविला जीवनप्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:57 IST

देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूलजवळील मल्हारीबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शिरोळे मायलेकींनी अचानकपणे रविवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास आपली मोपेड बाइक काढली अन् पाळदे मळ्याजवळील रेल्वे ट्रॅक गाठला. ट्रॅकपासून काही मीटर अंतरावर दुचाकी उभी करून दोघींनी धावत्या रेल्वेपुढे उडी घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देहृदयद्रावक : देवळाली कॅम्पजवळील डाऊनलाइन ट्रॅकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले मृतदेह

देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूलजवळील मल्हारीबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शिरोळे मायलेकींनी अचानकपणे रविवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास आपली मोपेड बाइक काढली अन् पाळदे मळ्याजवळील रेल्वे ट्रॅक गाठला. ट्रॅकपासून काही मीटर अंतरावर दुचाकी उभी करून दोघींनी धावत्या रेल्वेपुढे उडी घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देवळाली कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मल्हारीबाबा मंदिराजवळ अनिता बाळासाहेब शिरोळे (४३) या त्यांची कन्या राखी शिरोळे (२३) पती बाळासाहेब यांच्यासमवेत राहत होत्या. पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार असून, ते रविवारी सोलापुरात कामानिमित्त गेलेले होते. घरात मायलेकी दोघीच होत्या. या दोघींनी अचानकपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास मायलेकींनी स्कूटी गाडीने रेल्वे ट्रॅक गाठला. डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी आत्महत्या केल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांनी सांगितले. पोल क्रमांक १७६/५ जवळ दोघींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आले. एकाच वेळी आई व मुलीने आत्महत्या केल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. राखी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यांची थोरली मुलगी विवाहित आहे. मायलेकीने नेमके असे टाेकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकलेला नव्हता. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पवार या करीत आहेत.

--इन्फो--

....अशी उघडकीस आली घटना

पाळदे मळा परिसरात शेतीचे काम करण्यासाठी शेतकरी मजूर वर्ग शेतात जात असताना त्यांना रेल्वे ट्रॅकजवळ बेवारसपणे स्कूटी दिसली. यामुळे शेतकऱ्यांचा संशय बळावला. शेतकऱ्यांनी स्कूटीजवळ जाऊन बघितले. तसेच आजूबाजूलाही कोणी दिसत नसल्याने त्यांनी रेल्वे रुळाजवळ जाऊन डोकावले असता तेथे महिलांचे दोन मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले. शेतकऱ्यांनी घटनेची माहिती त्वरित देवळाली कॅम्प पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले.

---

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यू