सटाणा : मुकादमाजवळून घेतलेले हात उसनवारी पैसे परत का केले नाहीत, या कारणावरून पती-पत्नीचे भांडण पराकोटीला जाऊन पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील भवाडे येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय झिप्रू पवार (३५) व काळुबाई संजय पवार (३०) हे दोघे पती-पत्नी आपल्या मुलासह भवाडे येथे राहतात. संजयने मुकादमाजवळून हात उसनवारीने पैसे घेतले होते. ते पैसे परत का केले नाहीत, याचा जाब पत्नीने विचारला असता पती संजय पवार व पत्नी काळुबाई यांच्यात भांडण झाले. पैसे परत का केले नाहीत, याचा जाब विचारल्याचा राग आल्याने संजयने रागाच्या भरात आपल्या पत्नीला रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने मानेवर, पोटावर, मांडीवर व बरगडीवर भोसकून गंभीर जखमी केले. त्यात घाव वर्मी बसल्याने काळुबाईचा मृत्यू झाला.याप्रकरणी सटाणा पोलिसांनी संशयित आरोपी संजय पवार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई, पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव, सागर चौधरी, जयंत साळुंखे हे करीत आहेत.
भवाडे येथे पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:36 IST
सटाणा : मुकादमाजवळून घेतलेले हात उसनवारी पैसे परत का केले नाहीत, या कारणावरून पती-पत्नीचे भांडण पराकोटीला जाऊन पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील भवाडे येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
भवाडे येथे पत्नीचा खून
ठळक मुद्देपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.