शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी मनपाची मक्तेदारी अखेर संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 1:14 AM

गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे.

नाशिक : गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २१) झालेल्या लिलावात स्टॉल्सच्या लिलावाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील ५४३ स्टॉल्सचे बुधवारी (दि.२१) रेकार्ड लिलाव करण्यात आले. त्यात फक्त केवळ २२ स्टॉल्सचे लिलाव करण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षी फक्त १३ स्टॉल्सचे लिलाव झाले होते. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडाला होता.शहराच्या विविध भागात आणि रस्त्यांवर गणेश मूर्तींचे स्टॉल्स विक्रीसाठी असतात. त्यात पूर्वी नेहरू उद्यानाजवळ असणारे स्टॉल्स नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर भरू लागले. परंतु येथे शांतता क्षेत्र असल्याने ते गोल्फ क्लबलगतचे मैदान (इदगाह) थाटण्यास परवानगी दिली जाऊ लागली. परंतु कधी ईद तर कधी अन्य धार्मिक कारण पुढे करून व्यावसायिक अगोदरच रस्ता बळकावून बसत.महापालिकेच्या परवानगीशिवाय काही राजकीय नेते गाळे तयार करून परस्पर भाड्याने देत. महापालिकेकडून नाममात्र भाडे देऊन त्यातील फायदा मात्र राजकीय व्यक्ती मिळवत असल्याने रस्त्यावर स्टॉल्स थाटण्यास महापालिकेने विरोध केला. परंतु परवानगीशिवाय एकदा स्टॉल थाटल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली की कारवाईबाबत महापालिका आणि पोलीस खाते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असे. गेल्या वर्षी तर तत्कालीन आयुक्तांनी पंचवटीत तपोवन मैदानावर स्टॉल्स भाड्याने देण्याची तयारी केली. त्यानंतर इदगाह मैदानावर स्टॉल्ससाठी लिलाव झाले. परंतु विक्रेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली आणि त्यानंतर पीटीसीसमोर एका खासगी जागेत स्टॉल्स थाटले.दरम्यान, शहरात डोंगरे मैदान, बीवायके जवळील प्रिं. कुलकर्णी चौकासमोरील जागा तसेच गंगापूर रोडवरील खतीब डेअरीसमोरील जागा अशा अनेक ठिकाणी खासगी भूखंडांवर भाड्याने जागा घेऊन स्टॉल्स थाटले जात असल्याने आता बहुतांशी ठिकाणी महापालिकेच्या लिलावाला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या ५४३ स्टॉल्सचे लिलाव केले त्यात नाशिक पूर्वमध्ये पंधरापैकी ५ स्टॉल्सला प्रतिसाद मिळाला. पंचवटीत ४३ पैकी १२ आणि सिडकोत २८ पैकी ५ स्टॉल्सला देकार मिळाले आहेत. मात्र पश्चिम विभागातील १४२, नाशिकरोडमधील २६५, सातपूरमधील ५० याठिकाणी स्टॉल्सला कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. व्दारका येथील गाळ्यांसाठी सर्वाधिक देकार ३९५० रुपयांचा मान्य झाला तर रासबिहारी आणि व्दारका येथील काही स्टॉल्ससाठी ३७०० रुपये इतका देकार लाभला.

टॅग्स :ganpatiगणपतीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका