शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार कर्मचाऱ्यांना मनपाचे अभय?

By admin | Updated: January 15, 2015 00:25 IST

थकबाकीदार कर्मचाऱ्यांना मनपाचे अभय?

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्ती मोहीम तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई करण्यात येते; परंतु मनपामध्येच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासूनची हजारो रुपयांची पाणीपट्टी थकीत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे थकबाकीतून मनपा कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने दरवर्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई करण्यात येते. या भीतीपोटी सर्वसामान्य नागरिक मनपाची थकबाकी भरतात; परंतु याच मनपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत असलेल्या मनपा कर्मचाऱ्याकडे गेल्या दहा ते बारा वर्षांपासूनची पाणीपट्टी थकीत असतानाही त्याच्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सदर मनपा कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नावे ३१/१/२००४ पर्यंत सुमारे २३ हजार ९९१ रुपये इतकी थकबाकी आहे. विशेष म्हणजे, २००४ नंतर सदर कर्मचाऱ्यास अद्यापपर्यंत थकबाकीपोटी कुठलाही तगादा तर लावलेला नाहीच; परंतु २००४ पासून पुढील पाणीबिलही त्यांना पाठविले नसल्याचे समजते. सन २००९-१० मध्ये एकदा मनपाने नोटीस बजावली असून, यानंतर मात्र अद्यापही थकबाकी वसूल झालेली नाही. एकूणच मनपा कर्मचाऱ्यांकडील थकबाकीची वसुली न करता त्यांना अभय दिले जात असून, सर्वसामान्य नागरिकांना मात्र थकबाकीसाठी मनपाकडून तगादा लावण्यात येतो. यामुळेच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीतून मनपा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. (वार्ताहर)