महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

By Suyog.joshi | Published: February 16, 2024 07:34 PM2024-02-16T19:34:51+5:302024-02-16T19:35:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती.

Municipal Commissioner Election Budget | महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

नाशिक  : आगामी निवडणुकांच्या पाश्व'भूमीवर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शुक्रवारी कोणतीही दरवाढ नसलेले सुमारे २६०२.४४ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक जाहीर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी (शहर), अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे (सेवा), मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. त्यांनंतर अखेर १६ फेब्रुवारीचा मुहूर्त लागला अन अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. दरम्यान आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने उत्त्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी आपला मिळ्कती बिओटी तत्वावर देउन उत्पन वाढवले जाणार आहे.
 
बजेट हायलाईटस
१) राज्यातील पहिले उद्यान विकसित करणार
२) सिंहस्थासाठी १० कोटींचा निधी टोकन म्हणून
३) जीएसटी अनुदानात आठ टक्के वाढ गृहित
४) बिओटी तत्वावर भूखंड विकसनातून १५० कोटींचा महसूल मिळणार
५) वर्षभरात नवीन कामांसाठी ५३५ कोटींचा निधी मिळणार
६) महापालिका मिळकतींवरील मोबाइल टॉवर देणार आठ कोटींचे उत्पन्न
 
भुजबळांचे नाव राहिले
अंदाजपत्रकाच्या निवेदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचेसह पालकमंत्री दादा भुसे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा छगन भुजबळ यांचे नाव नाही. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी भुजबळ यांचे नाव अनावधानाने राहून गेल्याचे सांगितले. (१६ एनएमसी)

Web Title: Municipal Commissioner Election Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक