शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिबट्याचा संचार : पिंजरे, ड्रोन अन् सावज बदल असे सगळेच प्रयोग निष्फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 6:11 PM

मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.

ठळक मुद्देऊसशेतीत भरदिवसा बिबट दर्शन अद्याप एकही बिबट्या जेरबंद होऊ शकलेला नाहीबिबट्याचा शोध ड्रोनद्वारेही घेतला गेला

नाशिक : तालुक्यातील दारणाकाठालगतच्या दोनवाडे ते भगुर गावापर्यंतच्या पंचक्रोशीत सध्या दोन आठवड्यांपासून बिबट या वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट-मानव संघर्ष या भागात उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी नाशिकवनविभागाकडून सातत्याने विविध स्तरावर प्रयोग अन् प्रयत्न केले जात आहेत; मात्र अद्याप वनविभागाचा कुठलाही प्रयोग यशस्वी होऊ शकतलेला नाही. दारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचे शेतकरी सांगतात.

एप्रिलमध्ये हिंगणवेढेत बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा बळी गेला तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोनवाडे गावात चारवर्षीय बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावला. यानंतर काही दिवसांनी पुन्हा बिबट्याने दोनवाडेत एका वृध्दाला ठार मारले. शेवगेदारणात एका चिमुकलीला बिबट्याने थेट अंगणात येऊन पंजा मारला, सुदैवाने तीचे प्राण वाचले; मात्र बाबळेश्वरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याच्या हल्ल्यात नुकतेच प्राण गमवावे लागले. यामुळे या दारणाकाठालगतच्या पंचक्रोशीत बिबट वन्यप्राण्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे. पळसे गावातील टेंभी मळा असो किंवा एकलहरे सामनगाव रस्ता असो किंवा मग भगूर-दोनवाडे गावाचा रस्ता असो, या भागात कधी ऊसशेतीत भरदिवसा बिबट दर्शन देतो तर कधी रात्रीच्या सुमारासही शेतकऱ्यांना बिबट्याची भटकंती नजरेस पडते.बिबट्याला जेरबंद करण्याकरिता व बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी दोघांच्या जीवांच्यादृष्टीने विविध उपाययोजना वनविभाग करत आहेत.
नाशिक विभागासाठी रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली आहेत. बिबट्याच्या हालचालींवरही लक्ष ठेवून आहेत. रात्रीच्यावेळी कॅमेरा ट्रॅप लावून हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जात आहेत. बिबट्याला अत्यंत सुरक्षित व सहजरित्या जेरबंद करण्यासाठी पिंज-याचा उपाय योग्य ठरतो. बिबट्याचे आवडते खाद्य श्वान आहे, यामुळे श्वानदेखील पिंजºयात सावज म्हणून ठेवण्याचा प्रयोग केला गेला. या पंचक्रोशीत आठ ते दहा पिंजरे व सात ते आठ कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. बोरिवली येथील संजय गांधी  उद्यानाची वन्यप्राणी रेस्क्यू बचावपथकाचेही मार्गदर्शन यासाठी घेण्यात आले. तीन दिवस या चमूने स्थानिक चमुसोबत दोनवाडे-बाभळेश्वरचा परिसर पिंजून काढला आहे. तसेच पिंजऱ्यांची रचना व ठिकाण याबाबतही माहिती दिली. यानंतर हे पथकदेखील आता माघारी परतले आहे. ऊसशेतीचे विस्तीर्ण व दाट क्षेत्र हे वनविभागापुढील मोठे आव्हान बिबट रेस्क्यूमोहीमेत ठरत असल्याचे वनधिकारी सांगतात. या भागात बिबट्याचा शोध ड्रोनद्वारेही घेतला गेला. सातत्याने एकूणच या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथके लक्ष ठेवून आहेत; मात्र अद्याप एकाही पिंज-यात बिबट्या जेरबंद होऊ शकलेला नाही.
जिल्ह्यात बिबट-मानव संघर्ष कमी होण्यामागे सर्वश्रूत कारण म्हणजे जंगलांचा दिवसेंदिवस होणारा -हास आहे. जंगलांचा -हास हा मानवाकडूनच त्याच्या काही गरजा भागविताना कळत-नकळत होत गेला; परंतू त्याच्या गंभीर परिणामांचा मानवाने यापुर्वी कधीही विचार केला नाही. मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतोजंगलांमध्ये होणारे अतिक्रमणदेखील याला कारणीभूत आहेत. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक क्षेत्रात मानवाने केलेले हस्तक्षेप घातक ठरू लागला आहे. कृत्रिमरित्या वणवाही जंगलांच्याभोवती पेटविला जातो आहे. मानवाच्या हव्यासापोटी केलेल्या चूकांची ही एक शिक्षाच आहे, असे म्हणणेच चुकीचे होणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राचे संवर्धन करणे मानवाच्या हातात आहेत. अवैध शिकार, अवैध वृक्षतोड मानवाने थांबविली पाहिजे आणि निसर्ग जपला पाहिजे, असे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर व उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकriverनदीwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग