दारणाकाठी संचार : बिबट्याची मादी पिंजऱ्यात; नर मात्र मैदानात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:17 IST2020-07-05T17:12:54+5:302020-07-05T17:17:47+5:30
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

सामनगाव शिवारात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या
नाशिक : दारणाकाठी असलेल्या जाखोरी गावात जेरबंद झालेल्या बिबट्या मादीची शनिवारी (दि.४) बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात रवानगी करण्यात आली. मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी झाले असले तरीही या भागात नर बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-याने टिपलेल्या छबींवरून स्पष्ट होते. यामुळे दारणाकाठालगतच्या गावकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दारणाकाठालगत बिबट्यांचा वाढता संचार हा वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सातत्याने या भागात ट्रॅप कॅमेरे आणि पिंजऱ्यांची संख्या वाढविली जात आहे. नाशिक पश्चिम व पुर्व भागाचे पथक दिवस-रात्र या परिसरात गस्तीवर आहेत. त्यांच्या मदतीला बोरिवलीचे गांधी उद्यानाचे पथकही कार्यरत आहे; मात्र या पथकांमध्ये असमन्वय निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पथकांना विश्वासात न घेता बोरिवलीवरून ह्यपाहूणेह्ण आलेल्या पथकाने 'एककलमी' उपाययोजना राबविण्यास सुरूवात केल्याने स्थानिक पथकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच मादी पिंजºयात अडकली त्यावेळी शेतातून पळताना दोन बिबटे शेतक-यांना नजरेसही पडल्याचे गावक-यांनी सांगितले. यामुळे वनविभागाने याठिकाणी पुन्हा दुसरा पिंजरा तैनात केला आहे. तसेच ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत.