सिन्नर : महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यभरातील आंदोलनाला अनुसरून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संंघटना, टी.डी.एफ. मुख्याध्यापक संघटना व विविध संघटनांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले.पोलिसांनी परवानगी नाकारूनही शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिक्षक संघटना साखळी उपोषणाच्या तयारीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनविरोधी घोषणांनी जिल्हा परिषद परिसर यावेळी दणाणून गेला होता.पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनवेळी शिक्षण क्षेत्राच्या गलथान कारभारावर व शिक्षणविरोधी धोरणावर आमदार डॉ. तांबे, एस. बी. देशमुख यांनी सडकून टीका केली.यावेळी प्रत्येक तालुक्याची माध्यमिक शिक्षक संघटना, टी.डी.एफ. मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना यांच्या कार्यकारिणी स्थापन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना कैलास देवरे, मोहन चकोर, नानासाहेब देवरे, एस.के. सावंत यांनी दिल्या. ७ वा वेतन आयोगात फसवणूक, अंशदायी पेन्शन योजना सोईस्कर टाळाटाळ, शालार्थ आय.डी. देण्यासाठी शासनाचा शासकीय यंत्रणेवर विश्वास नाही, अनुदान देण्यासाठी टाळाटाळ हा सर्व प्रकार लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि.१६) आमदार तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली असल्याची माहिती देण्यात आली.
शिक्षक संघटनांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:06 IST
सिन्नर : महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यभरातील आंदोलनाला अनुसरून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संंघटना, टी.डी.एफ. मुख्याध्यापक संघटना व विविध संघटनांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले.
शिक्षक संघटनांचे आंदोलन
ठळक मुद्देनिवेदन : संघटना साखळी उपोषणाच्या तयारीत