शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेत नेतृत्व बदलाच्या हालचाली

By admin | Updated: April 27, 2017 02:17 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावत चालल्याने त्याचा सर्व ठपका जिल्हा बॅँक अध्यक्षांवर ठेवत नेतृत्व बदलाच्या हालचालींना वर्तुळात वेग आला आहे

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याने त्याचा सर्व ठपका जिल्हा बॅँक अध्यक्षांवर ठेवत नेतृत्व बदलाच्या हालचालींना जिल्हा बॅँक वर्तुळात वेग आला आहे. भाजपाचे सरकार असल्याने भाजपाचाच अध्यक्ष करून सरकारची मदत पदरात पाडून घेण्यासाठी संचालक केदा अहेर व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची नावे नवीन अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरू असलेल्या आंदोलनांचा धसका घेऊन म्हणा यापूर्वीच जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर शेतकरी व जनसामान्यांची बॅँक असल्याने ही बॅँक वाचविण्यासाठी काहीही करा, प्रसंगी भाजपाचा अध्यक्ष करा, मी राजीनामा देतो, अशी भूमिका जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत घेतल्याची चर्चा आहे. काही संचालकांनी खासगीत बोलताना अध्यक्षांनी त्यांचा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आमच्याकडे यापूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात बहुतांंश जिल्हा बॅँकांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेच अध्यक्ष असल्याने सरकार नेहमीच जिल्हा बॅँकांना मदत करण्याच्या भूमिकेत राहिले होते. प्रसंगी थकहमी घेणे, अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देणे यांसह विविध प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतच जिल्हा बॅँकांना सरकारच्या माध्यमातून झाल्याचे बोलले जाते. आताही केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने सरकारची मदत हवी असेल तर सत्ताधारी पक्षाच्या संचालकांना अध्यक्ष केल्यास जिल्हा बॅँकेची आर्थिक कोंडी फुटू शकते, असा मतप्रवाह काही संचालकांमध्ये आहे. त्यातूनच मग आता अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी आक्रमक नेतृत्व असल्यास वसुलीला अनायसे मदत तर होईलच मात्र रोज उठून होणाऱ्या आंदोलनांनाही चाप बसेल, अशी चर्चा जिल्हा बॅँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)आव्हान कोण स्वीकारणारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक घडी विस्कटलेली असून, बॅँक अनंत अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे बॅँकेच्या अध्यक्ष बदलाबाबत कोणी संचालक चकार शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला सुस्थितीत आणण्याचे आव्हान कोण स्वीकारणार याबाबत जिल्हा बॅँकेच्या सभासद व शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.